Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited announce a New Recruitment for the post of “Electrical Assistant” Vacancies. there are 5347 vacancies will be filled. Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as on the date of publication of this advertisement.
This article provides to you about Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 detailed information about candidates educational qualification, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment of Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 Also the related recruitment details are in the advertisement. so please Read the recruitment Official advertisement carefully before applying. visit our website www.naukricentre.com

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये “विद्युत सहाय्यक” या रिक्त पदासाठी नवीन भरती सुरु आहे. यामध्ये ५३४७ रिक्त जागा भरली जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या लेखात दिली आहे.

तसेच संबंधित भरतीचा तपशील जाहिरातीत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


अन्य महत्वाच्या भरती


भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

 • एकूण पदे : ५३४७ पदे
 • पदाचे नाव :-“विद्युत सहाय्यक”
 • शैक्षणिक पात्रता : –
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
 • निवड प्रक्रिया – परीक्षा
 • परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
 • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
 • नोकरी ठिकाण –
 • वेतन श्रेणी :
 • (अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेली मूळ जाहिरात पाहावी .)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज फी –
 • अर्ज पाठविण्याचा ई-मेल –
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता — .
 • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्ष
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मानधन:- १. निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.

अ) प्रथम वर्षएकूण मानधन रुपये १५,०००/-
ब) द्वितीय वर्षएकूण मानधन रुपये १६,०००/-
क) तृतीय वर्ष
एकूण मानधन रुपये १७,०००/-
२. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
३. “विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७१०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.

महत्वाच्या तारखा :-

१. ऑन लाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL Link कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये प्रसिध्द करण्यात येईल, त्यासोबत ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.
२. ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी (Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी / मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येईल.


समांतर आरक्षणाच्या तरतुदी :-

०.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षणाची पदे (महिला, खेळाडू इत्यादी) नमूद केली आहेत, तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर विद्यमान पदसंख्येमध्ये बदल वाढ होऊ शकते. सदर बदललेली पदसंख्या निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल, यास्तव, जाहिरातीमध्ये पदसंख्या कमी असल्यामुळे सदर पदासाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्यावर विचारात घेतली जाणार नाही.
२. महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग इत्यादीकरिता समांतर आरक्षण राहील,
३. महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तसेच अनाथ इत्यादीकरिता असलेले समांतर आरक्षण कंपनीने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रक सुधारपत्रकानुसार राहील.

४. समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/ १६-अ, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अर्ज करण्याची पध्दत :

१. उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करु शकतात. यासोबत दिलेल्या लिंकवर ऑन लाईन अर्ज ‘भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत,


२. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (valid) स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, भरती प्रक्रिये दरम्यान नोंदणी केलेला सदर ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक वैध कार्यरत राहणे आवश्यक आहे.


३. ऑन लाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक नोंद करावी.


४. विहित नमुन्यातील ऑन लाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर माहे जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल. सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे, उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील, अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची विशेष नोंद घ्यावी.


५. अर्जामध्ये नमूद केलेली विवरणे बाबीच ग्राह्य धरण्यात येतील, अर्ज सादर केल्यानंतर दिलेली माहिती/ विवरणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

६. उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता स्वतंत्रपणे आवेदनपत्र पाठविण्यात येणार नाही, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र डाऊनलोड करुन घेऊन त्यामध्ये माहिती भरावयाची आहे. ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल, ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या प्रवेशपत्रावर चाचणी केंद्राचा तपशील देण्यात येईल. चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्याकरीता आवश्यक असलेले उमेदवार नोंदणी झालेले नसल्यास सदरचे चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार नाही. सदरच्या चाचणी केंद्राचे उमेदवार त्याचप्रमाणे चाचणी केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी झाल्यास उपलब्धतेनुसार नजीकच्या चाचणी केंद्रावर वर्ग करण्यात येतील, चाचणी केंद्रामध्ये बदल करण्याची उमेदवारांची मागणी स्विकारली जाणार नाही.


७. ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जामधील सर्व माहितीची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरावा जसे की शैक्षणिक अर्हता, वय तसेच जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, खेळाची प्रमाणपत्रे, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त दाखला इत्यादी प्रमाणपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रती सिस्टीम जनरेटेड अर्जासोबत मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त आहे. अशा सादर केलेल्या अर्जाची छाननी नेमणूक देण्यापूर्वी अथवा त्यानंतर कोणत्याही टण्यावर करण्यात येईल.


८. अर्जामध्ये केलेला दावा व सादर केलेल्या कागदपत्रांतील दावा यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती खोटी समजण्यात येईल. अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करु न शकल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल,


९. शासकीय/निमशासकीय महामंडळ, इतर कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने भरावे व अशा परवानगीची प्रत कागदपत्रे पडताळणीवेळी उपलब्ध करावी.


परीक्षा शुल्क :

१. उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठीमागासवगीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी
रु. २५० + GST रु. १२५ + GST
२. उमेवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क Credit Card/ Debit Card/Internet Banking द्वारे भरावयाचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.
३. उमेदवारांना ऑन लाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” राहील.
४. जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गाकरीता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
५. ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बैंक चार्जेस भरावी लागतील.

खाली चे अधिकृत संकेतस्थळ व PDF जाहिरात दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.


Official Website


जाहिरात PDF


अशाच update माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करा


अर्ज कसा करावा

१. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. “विद्युत सहाय्यक” रिक्त पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
३. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहे .
४..इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित ईमेल पत्यावर वर अर्ज करायचे आहे .
५. तसेच लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरात मध्ये दिले आहे.
६. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
७. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
८. या भरतीकरिता अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे
९. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा
१०. अधिक माहिती करिता कृपया दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
×